गडचिरोली : ऊर्जासंबंधी संसदीय स्थायी समितीची बैठक ताज मलबार रिसॉर्ट कोचीन (केरळ) येथे पार पडली. या बैठकीत समितीचे सदस्य डॅा.नामदेव किरसान यांनी गडचिरोली जिल्ह्यात पाण्यावर चालणारा हायड्रो पॅावर प्रोजेक्ट निर्माण करण्याची मागणी केली.
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात अनेक नद्या असून पाण्याची मुबलकता आहे. पण वाहत्या पाण्याचा कोणताही उपयोग या क्षेत्रात होत नाही. याकरिता या लोकसभा क्षेत्रात हायड्रो पॉवर प्रोजेक्ट निर्माण करण्याची शिफारस त्यांनी केली.
सदर बैठकीत भारत पेट्रोलियम, गेल, इंडियन ऑइल, एनएचपीसी, एनटीपीसी, एसजेव्हीएन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. एनएचपीसी ही कंपनी हायड्रो पॉवरशी संबंधित आहे. त्यामुळे डॅा.किरसान यांनी ही मागणी पुढे केली.