गडचिरोली : कोहळी समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी समाजबांधवांची बैठक पद्मश्री डॅा.परशुराम खुणे यांच्या अध्यक्षतेखाली विसोरा येथे नाना नाकाडे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. त्यात अध्यक्षपदी डॅा.चंद्रकांत यादवराव नाकाडे (विसोरा) यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने नाना पाटील नाकाडे, केंद्रीय सभासद ओमप्रकाश संग्रामे, घनश्याम परशुरामकर, विलास सोनेवाने उपस्थित होते.
सर्वानुमते गठीत केलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष विवेक प्रभाकर बुद्धे (गुरनोली), सचिव सुनील रामचंद्र देशमुख (नवेगाव, गडचिरोली), सहसचिव विनोद आनंदराव गोबाडे, कोषाध्यक्ष नित्यानंद त्र्यंबक बुद्धे (चिखली, ता.वडसा, संघटक म्हणून डॉ.नेताजी बन्सोड (वडसा), दुर्वास बुद्धे (आरमोरी), प्रा.दीपक नाकाडे (वडसा), अनिता बोरकर (नगराध्यक्ष, कुरखेडा), डॉ.मोहिनी विलास खुणे (गडचिरोली), तसेच सदस्य म्हणून दुधराम रूषी नाकाडे (कोरेगाव), न्या.पांडुरंग श्यामराव खुणे (अरततोंडी), रमेश गुलाब पुस्तोडे (कुरखेडा), नाजुकराव साधुजी रुखमोडे (आरमोरी), ओमप्रकाश मेघराज नाकाडे (आरमोरी), खुशाल वंगनुजी कापगते (चामोर्शी), उत्तम मुंगमोडे (अहेरी), प्रा.डॉ.मुरलीधर रूखमोडे (कोरची) आणि मार्गदर्शक मंडळात पद्मश्री डॉ.परशुराम खुणे (गुरनोली), नाना पा.नाकाडे (विसोरा), डॉ.ओमप्रकाश नाकाडे (आरमोरी), खुशाल आत्माराम मस्के (गडचिरोली), डॉ.तेजराम बुद्धे (कुरखेडा), श्रावण पा.कापगते (गडचिरोली) यांचा समावेश आहे.