लॉयड्स फाउंडेशनने नवीन इमारतीसह बदलविले कोनसरीच्या जि.प.शाळेचे रूप

मुलांच्या उज्वल भविष्याकडे एक पाऊल

गडचिरोली : लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोनसरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला नवीन इमारतीचे आणि डायनिंग हॉलचे बांधकाम करून दिले. या इमारतीवर केलेली आकर्षक रंगरंगोटी पाहून ही जि.प.शाळेची इमारत आहे की एखाद्या खासगी शाळेची असा प्रश्न पडतो. या इमारतीचे उद्घाटन लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन बालसुब्रमण्यम आणि कार्यकारी संचालक एस.वेंकटेश्वरन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.चे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट सेवा) कर्नल संग्राम महापात्रा, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बलराम सोमनानी, उपसरपंच रतनराव अक्केवार आदी उपस्थित होते.

लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा मला अभिमान वाटतो. मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यात आपले योगदान लाभत असल्याचे समाधान असल्याची भावना यावेळी एमडी बी.प्रभाकरन यांनी व्यक्त केली.

या सुंदर आणि स्वच्छ इमारतीमुळे, सुसज्ज डायनिंग हॅालमुळे इयत्ता 1 ते 4 मधील 140 पेक्षा अधिक मुलांना आता शिकण्यासाठी अधिक पोषक वातावरण मिळणार आहे.