अहेरी : अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांची अचानक बदली होऊन बुधवारी (दि.21) त्यांच्या जागी पो.निरीक्षक हर्षल एकरे यांनी अहेरीचे नवीन ठाणेदार म्हणून पदभार घेतला.

पो.नि.हर्षल एकरे यांनी या यापूर्वी सन 2011 ते 2014 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात C-60 पथकात व इंटेलिजन्स ब्युरोत सेवा दिली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील खापा, भिवापूर पोलीस स्टेशनला आणि चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) सेवा दिली आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असताना महत्वपूर्ण व गंभीर गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर त्यांची बदली गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात झाली होती.
अहेरी परिसरातील सर्व अनधिकृत कामे आणि गुन्हेगारीवर ते नियंत्रण ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.