गडचिरोली : निती आयोग आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सहा निर्देशकांचा ‘संपूर्णता’ अभियानाचा प्रारंभ शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते केले जाणार आहे.
या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा व भामरागड या 3 तालुक्यांची निवड झालेली आहे. या अभियानांतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण इत्यादी विकास क्षेत्रातील विविध 39 निर्देशांक उंचावण्यावर भर दिला जाणार आहे. यापैकी 6 निर्देशकांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने निती आयोगामार्फत 5 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान संपूर्णता अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी आय.टी.आय. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शालेय विद्यार्थ्यांची रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे.