देसाईगंज : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10 व्या राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी देसाईगंज (वडसा) येथील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी गोव्याकडे रवाना झाले. हे अधिवेशन 7 ऑगस्ट 2025 रोजी गोव्यातील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी या प्रतिनिधींना शुभेच्छा देत त्यांच्या वाहनाला झेंडा दाखवून रवाना केले.
मा.आ.गजबे यांच्या कार्यालयासमोर अधिवेशनासाठी जाणाऱ्या वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी गजबे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि धोरणांवर चर्चा केली जाणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना, वडसा-देसाईगंजचे तालुका अध्यक्ष महेश झरकर, तसेच प्रमुख पदाधिकारी सुनील पारधी, वसंत दोनाडकर, नेताजी तुपट, सुरेंद्र ढोरे, कार्यकारी संचालक शंकर पारधी, संचालक आदित्य मिसार, संजय बगमारे, हिरालाल शेंडे, कैलास पारधी, योगेश्वर राऊत, गणेश चिंचोळकर, सहसचिव भास्कर बन्सोड, माणीक बन्सोड, चक्रधर नाकाडे, मेघनाथ दुनेदार, मोहन पा.गायकवाड, गोपाल दर्वे, कैलास कुथे, चंद्रकांत रणदिवे, विनोद बुध्दे, मेघश्याम डांगे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.