आरमोरी : गडचिरोली मार्गावरील किटाळी गावाजवळ एका ट्रकसोबत समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील एका मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास घडला. तुळशिदास रामा सहारे (45 वर्ष) यांचा घटनास्थळीच मृ्त्यू झाला, तर त्यांचा मुलगा विरेंद्र उर्फ पियू (21 वर्ष) आणि दुचाकीचालक दिलीप सोमाजी टेकाम (48 वर्ष) हे जखमी झाले. ते तिघेही देऊळगाव येथील रहिवासी आहेत. ते एकाच दुचाकीवरून आणि हेल्मेट न घालता प्रवास करत होते.
प्राप्त माहितीनुसार, दिलीप टेकाम हे देऊळगाव येथील तुळशीदास व विरेंद्र सहारे या बापलेकांसह ट्रिपल सीट आपल्या दुचाकीने (एमएच 34, पी 8785) आकापूर येथील नातेवाईकांकडून परत देऊळगावकडे येत होते. दरम्यान किटाळी गावाजवळील बस थांब्याजवळ एक मालवाहू ट्रक (टीएस 07, युके 3992) समोरून येत होता. वळणावर दोन्ही वाहनांवर चालकांचे नियंत्रण राहिले नाही आणि त्यांच्यात धडक झाली.
याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध भा.न्या.सं. कलम 281, 106 (1), 125 (ए), 15 (बी), 324 (4), 184, तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम 134 (ए) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तुळशीदास रामाजी साहारे,वय 45 वर्षे,व त्याचा मुलगा पियु साहारे वय अंदाजे 21 राहानार देऊळगाव हे आज सकाळी आकापुर ला नातेवाईकाकडे गेले होते. वापस येंतांनी किटाळीच्या चौकात आज सकाळी अंदाजे 9.00 वाजता एका ट्रक नी जोरदार धडक दिली.या मध्ये वडील यांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला.त्याला गडचिरोली ला हलविण्यात आले.
































