दोन वेगवेगळ्या दुचाकींच्या अपघातात एक युवक ठार

स्कूल व्हॅनची दुचाकीला धडक

स्कूल व्हॅन अपघातातील जखमी युवक.

गडचिरोली / आष्टी : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या दुचाकींच्या अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला, तर एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली शहरालगत एसओएस शाळेकडून शहराकडे वेगाने येणाऱ्या स्कूल व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात महिलेसह युवक गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत मुलचेरावरू आष्टीकडे येताना दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळून एका युवकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. (अधिक बातमी खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, पहिल्या घटनेत सोमवारी सकाळी 8 वाजता गडचिरोलीच्या धानोरा मार्गावर सोमेश्वर नागोसे (42 वर्ष) हे दुचाकीने इंदिरा नगरकडून शहराकडे येत होते. यावेळी एका महिलेने त्यांना लिफ्ट मागितली. (अधिक बातमी खाली वाचा)

याचवेळी स्कूल आॅफ स्कॅालर्सकडून येत असलेल्या एका स्कूल व्हॅनने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्याने नंतर नागोसे यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविल्याचे सांगितले जाते. या अपघातात धडक देणाऱ्या व्हॅनचा चालक दारू पिऊन असल्याची चर्चा आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

दुसऱ्या घटनेत मुलचेरा येथून दुचाकीने ट्रिपल सिट आष्टीकडे येणाऱ्यांचे नियंत्रण सुटून त्यांची दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळली. यात लवकुश सदाशिव गोरडवार (31 वर्ष) रा.नांदगाव घोसरी (जि.चंद्रपूर) हा ठार, तर अक्षय वाकुडकर (27 वर्ष) आणि शुभम वाकुडकर (30 वर्ष) हे जखमी झाले. (अधिक बातमी खाली वाचा)

जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले.