ओडीगुडम येथील बोनालू पुजा कार्यक्रमाला महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांची गर्दी

भाग्यश्री आत्राम यांनीही केली पुजा

अहेरी : तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओडीगुडम येथील बोनालू कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थिती दर्शवत पूजाअर्चा केली. प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या महिलम्मा देवी मंदिर परिसरात दरवर्षी बोनालू पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही 28 ते 30 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

28 एप्रिल रोजी शाही गंगास्नान, 29 रोजी बोनालु उत्सव आणि 30 एप्रिल रोजी महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी परिसरातीलच नव्हेतर तेलंगाना राज्यातील भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

29 एप्रिल रोजी माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित राहून महिलाम्मा देवी मंदिरात पूजाअर्चा करत बोनालु उत्सवात सहभाग घेतला. या ठिकाणी असलेल्या महिलम्मा मंदिरात आयोजित कार्यक्रमात दरवर्षीच भाविकांची मोठी गर्दी होते. दूरवरून आलेले भाविक तीन ते चार दिवस मुक्कामाने राहतात. त्यामुळे भाग्यश्रीताई यांनी भविकांशी आस्थेने संवाद साधत व्यवस्थेची पाहणी केली हे विशेष.

यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य तसेच महेश बाकीवार, नागेश करमे, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, विजय कोकिरवार, नागेश पुल्लीवार, राजन्ना पैडीवार, भुदाराम पानेमवार, किशोर भट्टीवार, मुत्ता देवरवार, अशोक पानेमवार, लचम्मा पानेमवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा वाचा खाली)