धानोरा : डॅा.बाबासाहेबांना केवळ अभिवादन करून जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना तेवत ठेवण्याच्या उद्देशाने धानोरा तालुक्यातील चातगाव येथे डॅा.प्रमोद साळवे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी स्वत:च्या जागेतील 2 हजार स्क्वेअर फूट जागा नवयुवक बौद्ध समाज चातगावला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला चालना मिळावी म्हणून बांधकाम व इतर सोयींकरीता भेट दिली. त्या जागेवर डॅा.आंबेडकर जयंतीनिमित्त डॅा.प्रमोद साळवे यांच्या हस्ते पिंपळवृक्षाचे रोपण करण्यात आले.
चातगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यकम नवयुवक बौद्ध समाजाच्या वतीने अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे आणि चातगावचे माजी सरपंच नारायण सयाम प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.साळवे यांनी रांगी मार्गावरील त्यांच्या जमिनीतील 2000 चौ.फुट जागा राखीव ठेवत ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीनुसार काम करण्याकरीता बांधकामासह इतर सोयींकरीता नवयुवक बौद्ध समाजाला दिली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आजच्या काळात बाबासाहेबांची समता, बंधुता व एकतेची शिकवण अत्यंत महत्वाची असून देशाच्या विकासाचे हे ब्रीद-वाक्य असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजक विनायक सोरते यांनी प्रास्ताविक केले. संचालन पियुष नंदेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन अनिलेत गुमला यांनी केले. कार्यक्रमासाठी विजया सोरते, शालिनी मेश्राम, ललीता नंदेश्वर, विकास चक, प्रशांत कोंडागुर्ले, आदित्य नंदेश्वर, नितीन अल्लुर यांनी परिश्रम घेतले.