गडचिरोली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत राजकीयदृष्ट्या संवेदनशिल स्थितीत कायदा व सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी विशेष पोलीस ऑब्झर्वर म्हणून तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात आरमोरी क्षेत्रासाठी आरीफ हफिज, गडचिरोलीसाठी हृदय कांत आणि अहेरी क्षेत्रासाठी अनुपम शर्मा हे दाखल झाले आहेत.
आरमोरी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असलेले पोलीस ऑब्झर्वर आरिफ हाफिज हे गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस, गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंबंधात जनतेच्या काही तक्रारी असतील तर गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आरिफ हफिज (भा.पो.से.) यांची भेट घेवुन तक्रारी काराव्यात, किंवा मोबाईल नंबर 7588134720 यावरही त्यांच्याशी संपर्क करता येईल.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी पोलीस ऑब्झर्वर म्हणून ह्यदयकांत (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते गोंडवाना युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊस गडचिरोली या ठिकाणी वास्तव्यास राहतील. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांची भेट घेऊन तक्रार करावी, किंवा मोबाईल नंबर 9404306040 यावर संपर्क करावा, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.
तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी अनुपम शर्मा हे रुजू झाले आहेत. ते आयपीएस मेस, न्यू रेस्ट हाऊस, अहेरी (प्राणहिता पोलीस उपमुख्यालय) या ठिकाणी वास्तव्यास असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी रेस्ट हाऊस येथे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत त्यांची भेट घेवुन तक्रार करावी, अथवा त्यांच्या मोबाईल नंबरवर (9404306035) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.