गडचिरोली : गडचिरोली शहरात विजयादशमी व नवरात्र उत्सवाची सांगता दुर्गादेवी आणि शारदादेवीच्या विसर्जन मिरवणुकांनी होणार आहे. त्याअनुषंगाने चोख बंदोबस्तासाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेश देण्यासाठी बुधवारी सायंकाळी 4.30 ते 6 वाजेदरम्यान विसर्जन मार्गावर पोलिसांनी पथसंचलन केले.
हे पथसंचलन गडचिरोली पोलीस ठाणे – पटेल मंगल कार्यालय – भारतीय स्टेट बँक – गोकुळ नगर तलाव पॉईंट- कारगिल चौक- हनुमान वॉर्ड – आठवडी बाजार- सराफा लाईन – ढिवर मोहल्ला- तेली मोहल्ला- सुभाष वॉर्ड- फुले वॉर्ड – सर्वोदय वॉर्ड- रामपुरी वॉर्ड- गुरूकुंज कॉलनी- गांधी चौक- महिला रुग्णालय- रामनगर परिसर- बेसिक शाळा- रेड्डी गोडाऊन रोड- कॅम्प एरिया- कात्रटवार कॉम्प्लेक्स – पोस्ट ऑफिस मार्गे पुन्हा पोलीस ठाणे अशा मार्गाने करण्यात आले. विसर्जन मिरवणुकांचे ड्रोन कॅमेऱ्यानेही चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याचेही प्रात्याक्षिक या पथसंचलनादरम्यान करण्यात आले.
पथसंचलनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस स्टेशनचे 9 अधिकारी व 65 अंमलदार, दंगा नियंत्रण पथक, पोलीस मुख्यालयातील 2 अधिकारी व 22 अंमलदार तसेच गृहरक्षक दलाचे 4 अधिकारी आणि 98 जवान असे एकूण 15 अधिकारी व 198 पोलीस अंमलदार व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.