अहेरीतील भीम रॅलीत सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

बाबासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश

अहेरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वज ज्येष्ठ नागरिक सुगंदाबाई ओंडरे यांच्या हस्ते फडकविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायण अलोणे, तर विचारपीठावर ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सचिव सुरेंद्र अलोणे, नगरसेविका मीना ओंडरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रियाज शेख, श्रीकांत मद्दीवार, पौर्णिमा मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला, तर महिलांनी सामूहिकरित्या भिमगीत गायन केले.

सायंकाळी अहेरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आली. यात सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सोहिल वाळके, रियाज शेख, नागेश मडावी, ताजू कुळमेथे, कपिल ढोलगे, राहुल गर्गम, संदीप ढोलगे, परशुराम दहागावकर, श्याम ओंडरे, प्रमोद भिमटे, महेंद्र मेश्राम, रामचंद्र ढोलगे, शिवाजी ढोलगे, देवाजी अलोणे, राजानंद दहागावकर, धनराज गोमासे यांच्यासह बहुसंख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.