गडचिरोली : नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात वर्ल्ड सेवन वंडर रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डद्वारा आयोजित 19 व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन 2024 मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांना ‘अतुल्य भारत’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने रमेश अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांना ‘नारीशक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विश्वशांती, राष्ट्रीय सुरक्षा, जलसंस्कृती संवर्धन, राष्ट्रीय एकता, सहिष्णुता, आंतरराष्ट्रीय निस्वार्थ मैत्रीभाव, आरोग्यसेवा, व्यसनमुक्ती, नैसर्गिक चिकित्सा, महिला सशक्तिकरण, साहित्य- कला व क्रीडा, तथा विविध उल्लेखनीय कार्यासाठी विविध राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल झोडे, विदर्भ अध्यक्ष जावेद शेख, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू खुणे, भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदू समरीत, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, मुन्ना दहाडे, महेश अलोणे, जिल्हा सचिव रतन दुर्गे, अहेरी तालुका अध्यक्ष फारुख शेख, मास्टर सुरेश दुर्गे, तालुका सचिव साईनाथ आउतकर, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्निल मडावी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.