गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन 7 आॅगस्ट 2024 रोजी अमृतसर (पंजाब) येथे होणार आहे. या महाअधिवेशनाच्या तयारीसाठी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 27 मे रोजी दुपारी 4 वाजता गडचिरोलीतील कात्रटवार कॉम्प्लेक्स सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीमध्ये पुढील विषयांवर चर्चा होणार आहे. 1) प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी अधिवेशनाला हजर राहावे यासाठी तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा 2) ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात चर्चा. 3) राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध शाखातील नवीन नियुक्त्या जाहीर करणे व त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देणे.
बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय युवा महासंघ, महिला महासंघ, कर्मचारी अधिकारी महासंघ, शेतकरी महासंघ, वकील महासंघ या सर्व शाखांचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, ओबीसी मधील सर्व जातीय संघटना आणि सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा अध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा.देवानंद कामडी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, संघटक सुरेश भांडेकर, शंकर चौधरी, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला अध्यक्ष संगीता नवघडे, मंगला कारेकर, सुधा चौधरी आदींनी केले आहे.