आरमोरी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतमध्ये नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांट मंजूर करण्यात आला होता. हे काम जलदगतीने पूर्ण झाले असून जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांटचे (ATM R.O. PLANT) लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पार पडले.
या लोकार्पणप्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, सरपंच प्रियंका कुमरे, मिनेश्वरी जांभुळे, माणिक पेंदाम, प्रकाश लेनगुरे, रामहरी चौधरी, दिलीप कुमरे, रोहिदास कुमरे, विजय नेवारे, कबिरादाश कुंभलकर, राहुल धाईत तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.