
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील निसर्गरम्य देवस्थान मुतनुर (पहाडी ) येथे गुढीपाडव्यानिमित्त यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला. जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी दिव्य महापुजा आणि विविध कार्यक्रमास हजेरी लावली. (अधिक बातमी खाली वाचा)

या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी सुद्धा विधिवत पुजन केले. (अधिक बातमी खाली वाचा)

मुतनूर पहाडीवर आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थान आहे. तसेच खालच्या भागात आदिशक्ती दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात व पहाडीवर गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडवा (मराठी नववर्ष) निमित्त गावकऱ्यांच्या वतीने यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजपा नेते रमेश भुरसे, अनिल पोहनकर, अविनाश विश्रोजवार, सामाजिक कार्यकर्ते सुरज पोटावी, विदर्भ केसरी फुलचंद वाघाडे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, विशाखा सिंह, तसेच लोकेश डोंगरवार, राकेश डोंगरवार, राहुल झोडे, दिनेश खुणे, प्रवीण गेडाम, तसेच संपूर्ण खुणे परिवार, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील भाविक, स्थानिक ग्रामसभा व इलाका प्रमुख, उपस्थित होते.




































