गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांकडून 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शनही केले.
कारगील स्मारक
शहरातील कारगील चौकातल्या स्मारकावर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उदय धकाते यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी श्री गुरुदेव उच्च प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ शिक्षक तुषार निकुरे यांनी केले. याप्रसंगी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, संजय गद्देवार, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, महादेव कांबळे, रामा हजारे, सुचिता धकाते, वनिता भांडेकर, संगीता धकाते, मुख्याध्यापिका मीरा मडावी, प्रा.सुनीता साळवे, संजय लांजेवार, विजय सुरपाम, साहिल गोवर्धन, गणेश मेश्राम तथा कारगील चौक परिसर व शहरातील नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी उपस्थिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, प्रदेश सचिव श्रीनिवास गोडसेलवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नानगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, राष्ट्रवादी गडचिरोली तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, तालुका सरचिटणीस सुधीर मडावी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय सिंगाळे, नगरसेवक रवी मेश्राम, नगरसेविका प्रतिभा कुंभरे, अंजुम सय्यद, विद्यार्थी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, अहेरी विधानसभा कार्याध्यक्षा सारिका गडपल्लीवार, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय रामने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कारवाफा आश्रमशाळा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते ध्वज फडकवून वंदन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.
ध्वजसंचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास वळधा, सदस्य देवराव नैताम, प्रकाश नरोटे, रामजी पुळो, चंदू नरोटे, उच्च माध्यमिक शिक्षक एम.ई.ठाकूर, टी.ए. आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी.डी.नळे, व्ही.एस.देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, विवेक नैताम, इंदरशाहा कुमरे, कविता बारसागडे, संजय धंदर, आशिष नंदनवार, स्वप्निल राठोड, हितेश गावळकर, शिवानी शेट्टीवार, करिश्मा गोवर्धन, पवन मेश्राम, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, वरिष्ठ लिपिक योगेश उसेंडी, सुनिता देवावार, संगीत करंगामी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
































