शिक्षक कातरकर आणि ज्येष्ठ लिपिक रामटेके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

दंडकारण्य संस्थेत अनेक वर्षांची सेवा

गडचिरोली : विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आंबेशिवनी येथे सहाय्यक शिक्षक असलेले पांडुरंग कातरकर आणि ज्येष्ठ लिपिक रुषी रामटेके हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे आणि संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष देवाजी पाटील नरूले यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सदस्य डॉ.सुरेश लडके, सौरभ मुनघाटे आणि मुख्याध्यापक जगदीश खरवडे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्कार करण्यात आला.

मनमिळावू आणि आदर्श व्यक्तिमत्व असलेले रामटेके बाबू दंडकारण्य शिक्षण संस्थेत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. कर्तव्यावर असताना कोणत्याच कामाचा आळस त्यांनी कधी केला नाही. शिक्षक कातरकर यांनी सुद्धा आपल्या सेवाकाळात चांगली सेवा देऊन एक आदर्श शिक्षक म्हणून लौकिक मिळवला.

यावेळी प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे आणि सत्कारमूर्ती कातरकर व रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार समारंभाला शिक्षक ए.आर. मेश्राम, रंजना चुधरी, योगेश पाल, प्रदीप नागापुरे, शरद डोईफोडे, माधुरी कांबळे, हर्षल खरवडे, रजत हेमके, पप्पूकुमार बांबोळे, देवेंद्र झंजाळ, विनायक मुनघाटे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक योगेंद्र झंजाळ, हिरामण आवारी, देवराव काळबांधे व पालक उपस्थित होते.