गडचिरोली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड. विश्वजित कोवासे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, माजी जि.प.सदस्य जगन्नाथ बोरकुटे, रोहिदास राऊत, प्रभाकर वासेकर, अॅड.राम मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक देवा सोनटक्के, दत्तात्र्यय खरवडे, रामकृष्ण ताजने, समशेरखान पठाण, लिना पठाण, मनोहर नवघडे, तसेच करोडकर, मस्के, बाणबले, शिंदे, पुडके, निशाणे, अलयनकर, बेहरे, महेंद्र भगवान, शाह काटेंगे, एम.भोयर, रुपचंद आकरे, प्रकाश सोनवणे, कृष्णराव नारदेलवार, किशोर झाडे, रमेश गडपायले, राजेंद्र हिवरकर, प्रकाश दुधे, आनंदराव पारधी सर, ज्ञानेश्वर मामोडवार, झाडे सर, गोडबोले सर, माधुरी मडावी, राधेशाम भोयर, शिरणकर, शिक्षिका झाडे, अलोणे, शिक्षक रोकडे, आर.एल. चौधरी यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन शक्य असल्याचे मत व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांनी अवघड परिस्थितीतही विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व दर्जेदार शिक्षण दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.