महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर

नागरिकांची निवेदने स्वीकारणार

गडचिरोली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. याशिवाय नागरिकांची निवेदनेही स्विकारणार आहेत.

19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते दुपारी 1 यादरम्यान मंत्री बावनकुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरीकांची निवेदने स्विकारतील. दुपारी 1 ते 2.30 दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाईल. दुपारी 2.30 ते 3.30 मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा, दुपारी 3.30 ते 4.30 भूमी अभिलेख विभागाचा आढावा आणि सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी चर्चा करतील. सायंकाळी 5.30 ते 7 दरम्यान महाराजा लॉन, धानोरा रोड, गडचिरोली येथे त्यांचा वेळ राखीव राहणार आहे.