गडचिरोली : थोर समाजसुधारक आणि स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे, अज्ञान, अंधश्रद्धा तसेच शिक्षण तसेच यासारख्या बाबींवर आयुष्यभर प्रखर प्रबोधन करणारे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची १४८ वी जयंती शुक्रवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात न.प.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली शहरअध्यक्ष विजय गोरडवार यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या निमित्ताने महाप्रसाद म्हणून मसाला भात व जिलेबीचे वितरण करण्यात आले.
यावेळी धोबी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आकनुरवार, अॅड.बाळासाहेब आखाडे, सुभाष रोहनकर, दिलीप कोल्हटवार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ताजने, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कोल्हटवार, महिला जिल्हा सचिव कल्पना चतुरकर, दिवाकर ताजने, भास्कर केळझरकर, दिलीप राहुलवार, दिलीप पेंदोरकर, गजानन कुद्रकवार, अशोक कोल्हटवार, रमेश गडपायले, अरविंद मादेश्वार, तालुका अध्यक्ष राजू कंठीवार, निलिमा केळझरकर, वैशाली ताजने, ज्योती येमपल्लीवार, विकास तरमनवार, अतुल केळझरकर, हेमंत कावळे, कृष्णा रोहनकर, बादल गडपायले, नेताजी कावळे, लंकेश येम्पल्लिवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.