गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दि.23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीचे आयोजन पटेल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली न.प.चे माजी सभापती विजय गोरडवार यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष आकणूरवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष रोहनकर, दामोधर येम्पल्लीवार, प्रभुदास कुरूडकर, दिवाकर येम्पल्लीवार, रमेश गडपायले, अरुण केळझरकर, महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा कोल्हटवार, महिला संघटन सचिव लता वरघंटे, सचिव कल्पना चतुरकर, उपाध्यक्षा मंगला केळझरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय गोरडवार यांनी सांगितले की, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या धोबी समाजाने गाडगेबाबांनी दिलेल्या उपदेशांचा अंगीकार करून सर्वांगिन प्रगती साधावी. संघटीत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची शक्ती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक संघटनेचे सचिव मोरेश्वर मानपल्लीवार यांनी तर सुत्रसंचालन सोनाली सुरनकर यांनी केले. यानंतर संत गाडगेबाबांच्या पालखीची शोभायात्रा मोठ्या थाटात शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रवीण ताजने, अरविंद मादेश्वार, नेताजी कावळे, अमोल दासरवार, राजू कंठीवार, नितीश केळझरकर, प्रभु रोहनकर, महेश कोतकोंडावार, माणिक केळझरकर, नरेश कावळे, प्रमोद ताडपल्लीवार, किशोर केळझरकर, मयुर दासरवार, प्रकाश राजकोंडावार आदी अनेकांनी सहकार्य केले.
































