गडचिरोली : येथील सोनार समाज सेवा संस्थेतर्फे बुधवार, २८ फेब्रुवारीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला आहे. आयटीआय चौक परिसराच्या पंचवटीनगरातील श्री नरहरी महाराज मंदिराच्या नियोजित जागेवर हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अशोक नेते, सहउद्घाटक भ्रष्टाराचारविरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी सोनार समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष नितीन हर्षे, मुख्य अतिथी म्हणून वैरागड ग्रामपंचायतच्या सदस्य शितल सोमनानी राहतील. विशेष अतिथी म्हणून चांगदेव फाये, सोनार समाज धानोराचे अध्यक्ष अजय हाडगे, आरमोरीचे अध्यक्ष पंकज खरवडे, देसाईगंजचे अध्यक्ष पंढरी कावळे, वैरागडचे अध्यक्ष अरुण हर्षे, चामोर्शीचे अध्यक्ष चंदन खरवडे, कुरखेडाचे अध्यक्ष शिवकुमार वडीकर उपस्थित राहतील.
घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल. सकाळी ९ वाजता मुक्तहस्त व ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा, सकाळी १० वाजता कार्यक्रम स्थळ ते श्रीराम मंदिर, इंदिरा गांधी चौक ते कार्यक्रम स्थळमार्गे बाईक रॅली काढण्यात येईल. दुपारी १२ वाजता दीप प्रज्ज्वलन, स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला सोनार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोनार समाज सेवा संस्थेने केले आहे.
ज्येष्ठांसह गुणवंतांचा होणार सत्कार
बुधवारी दुपारी १ वाजता ७५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार, दुपारी २ वाजता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. दुपारी ४ वाजता कलशयात्रा, सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, गीतगायन व डान्स स्पर्धा होईल. विविध क्षेत्रांत प्रावीण्यप्राप्त, तसेच कार्यक्रमात उत्कृष्ट धार्मिक वेशभूषा करणाऱ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.