गडचिरोली : गोंदिया येथे 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचा मुले व मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुलांच्या संघाचे कर्णधारपद गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या अंशुमान सहारे याच्याकड, तर मुलींच्या संघाचे कर्णधारपद शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची मोहिनी पिंपरखेडे हिच्याकडे देण्यात आले.
निवड करण्यात आलेल्या मुलींच्या संघात माधवी कडते, राधिका मगरे, सुप्रिया जुवारे, कृतिका वासेकर, निधी जांभुळकर, कृतिका तिवारी, धानी बिसेन, मनस्वी बोरघरे, आरती मुंगाटे, प्रशिक्षक प्रणाली वरगंटीवार, विपुल उंदीरवाडे यांचा समावेश आहे. मुलांच्या संघात अंशुमन आकेवार, कृष्णा अंभोरकर, अंश कोंडूकवार, निहाल गहूकर, प्रसन्न बागडकर, साहिल जगन्नाथ, श्रीकांत नैताम, विकल्प बर्डे, तसेच प्रशिक्षक म्हणून विनय कोवे यांची निवड झाली.
या संघांना बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.रुपाली पापडकर, शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे मनीष बानबोले, संघटनेचे जिल्हा सचिव ऋषिकांत पापडकर आणि निवड समिती प्रमुख आशिष निजाम यांनी शुभेच्छा देऊन रवाना केले.
































