गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 14, 16, 18 आणि 20 वर्षाखालील मुले आणि मुलींकरिता राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 16 व 17 ऑगष्ट या कालावधीत एम.आय.डी.सी.मैदान, गडचिरोली येथे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी 16 ऑगष्टला सकाळी 9 वाजतापासून लक्ष्यवेध अकॅडमी, गोंडवाना विद्यापीठासमोर, गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असून स्पर्धेमधून प्रत्येक क्रीडा प्रकारातील 2 विजयी महिला व पुरुष खेळाडूंची निवड राज्य संघटनेने दिलेल्या पात्रतेच्या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या संघात केली जाणार आहे.
स्पर्धेकरिता येताना खेळाडूंनी AFI ID क्रमांक, जन्माचा दाखला, आधार कार्ड आणि रहिवासी दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता आणि अधिक महितीसाठी मोबाईल क्रमांक 8999195070, 8275549514 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स सघंटनेचे सचिव आशिष नंदनवार यांनी केले आहे.
स्पर्धांसाठी वयोगट :
– 14 वर्षाखालील मुले आणि मुली
– 16 वर्षाखालील मुले आणि मुली
– 18 वर्षाखालील मुले आणि मुली
– 20 वर्षाखालील मुले आणि मुली