
देसाईगंज : खास लोकांच्या आग्रहास्तव कुरूड ग्रामवासियांच्या वतीने कुरूड येथे 5 व 6 फेब्रुवारी असे दोन दिवस बैलांच्या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते पार पडले.
आपली ग्रामीण परंपरा जपण्यासाठी शंकरपटासारख्या स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. ग्रामीण परंपरा, शेतकरी संस्कृती आणि लोकजीवनाशी नाते जपणाऱ्या या शंकरपट स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते, असे कृष्णा गजबे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रामदास मसराम, सहउद्घाटक म्हणून सुनील पारधी, शंकर पारधी, उपाध्यक्ष नितीन राऊत, गजानन सेलोटे, निखिल चव्हाण, प्रमुख अतिथी वसंत दोनाडकर, दिलीप नाकाडे, धनपालजी मिसार, योगेश नाकतोडे, महादेव ढोरे, दामोधर पटले, प्रतिभा उईके, पोलीस पाटील मंगेश मडावी आणि स्थानिक पदाधिकारी, ग्रामवासी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शंकरपटप्रेमी उपस्थित होते.






























