संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता महासंमेलनासाठी नियोजन सभा

शिंपी समाजबांधवांची उपस्थिती

गडचिरोली : नागपूर येथे येत्या 17 व 18 जानेवारी 2026 ला संत नामदेव राष्ट्रीय विश्वमहासंमेलन होणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने जाणीव जागृती करण्याबाबत आणि जिल्हास्तरीय नियोजन करण्यासाठी शिंपी समाजबांधवांच्या सभेचे आयोजन केले होते.

या सभेचा शुभारंभ संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलीत करून झाला. उद्घाटक म्हणून सुधर्मा खोडे (नागपूर) तर अध्यक्षस्थानी चंदु वडपल्लीवार होते. याशिवाय राजेश वडपल्लीवार, विजय आक्केवार (चंद्रपूर) सुदाम वाडेकर (नागपूर), राजेश नेरकर, सुनील किटे (नागपूर), दीपक नानोटकर, नामदेवराव गंधेवार, प्रशांत गटलेवार (चंद्रपूर), संतोष शनगरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रास्ताविकात गडचिरोली जिल्ह्यातील शिंपी समाजाची सद्यस्थिती आणि गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सुधर्मा खोडे यांनी विश्वमहासंमेलन 2026 बाबत सविस्तर माहिती दिली. विजय आक्केवार यांनी शिंपी समाजाचे संघटन महत्वाचे का आहे? याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन चंदु वडपल्लीवार यांनी केल्यानंतर तेलगू शिंपी समाज आणि मराठी शिंपी समाजाची संयुक्त कार्यकारिणी तयार करून पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रवी गंधेवार, प्रविण रामगीरवार, दिलीप गंधेवार, राजेश मुर्वतकर, राजेश नेरकर, प्रभा लोडल्लीवार, प्रणय गंधेवार, मारशेटीवार आणि गडचिरोली येथील समाज बांधवांनी सहकार्य केले. संचालन श्रीमती मुर्वतकर, तर आभार प्रविण रामगीरवार यांनी मानले.