विविध राजकीय पक्षांकडून शिवजयंती साजरी, पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन

आमगाव (बुट्टी) येथे विविध उपक्रम

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आदरांजली

गडचिरोली : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेलचे अध्यक्ष भारत येरमे, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे, बंडोपंत चितमलवार, अनुप कोहळे, शुभम किरमे, रवी क्षीरसागर, विकी मादेशवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आमगावात आ.गजबे यांच्या उपस्थितीत मिरवणूक

देसाईगंज तालुक्यातील आमगाव (बुट्टी )येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने दि. 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दि.16 ला गाव सजावट, दि.17 ला जिल्हा रुग्णालय गडचिरोलीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 20 जणांनी रक्तदान केले. दि.१८ ला प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळा, निबंध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, दौड स्पर्धा तर दि.19 ला बाईक रॅली, रांगोळी स्पर्धा, महाप्रसाद व छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमगावच्या सरपंच रूपलता बोदेले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माजी सरपंच योगेश नाकतोडे, ग्रामपंचायतचे सचिव दयाराम श्रीरामे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कार्तिक कोसेकर, उपाध्यक्ष तुषार ठाकरे, सचिव मृणाल काळबांधे तसेच समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.