कारवाफा आश्रमशाळेत सामाजिक समता सप्ताहाची उत्साहात सांगता

आठवडाभर चालले विविध उपक्रम

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे 8 ते 14 एप्रिलदरम्यान आयोजित सामाजिक समता सप्ताहाची भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक सी.डी.नळे , पद्मावती महेशगौरी, शिक्षक सुधीर शेंडे, वर्षा मस्के, शिक्षिका चंदा कोरचा, रविकांत पिपरे, आय.एम. कुमरे, अधीक्षक गजानन सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थिनी संजना हिचामी, कल्याणी परसे, शशिकला उसेंडी, संयुक्ता तुमरेटी, श्रुती उसेंडी, पिंकी एक्का, साक्षी नरोटे, राणी मडावी, रचना मडावी, मीनाक्षी गावडे, पूर्वी परसे आदींनी क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी समीक्षा उसेंडी हिने केले. संजना मट्टामी या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.