देसाईगंज : तालुक्यातील आमगाव येथे महर्षी वाल्मिकी ढिवर समाज संघटनेच्या वतीने महर्षि वाल्मिकी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त 15, 16 व 17 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा 17 मार्च रोजी झाला. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीचे पुजन केले (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठाणी, तालुका महामंत्री योगेश नाकतोडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश कोल्हे, ट्रस्टचे अध्यक्ष उद्धव चंडीकार, दिगंबर मेश्राम, माधव चंडीकार, सोमेश्वर मेश्राम, रवी गेडाम, प्रमोद पोहनकर, विजय चंडीकार, रवी नखाते, महादेव मेश्राम, मनीष मेश्राम, किरण ठाकरे, ग्रामसेवक कावळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.