पावसापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे कवच

आ.धर्मरावबाबांच्या वतीने वाटप

अहेरी : माजी कॅबिनेट मंत्री आणि अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यातर्फे आष्टीच्या सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे पावसापासून वाचण्यासाठी मुलांना मोठा आधार मिळाला. लोककल्याण फाऊंडेशन आष्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ममता डांगे, राखी मडावी, सरोजा बोंडे, मुख्याध्यापिका एस.डी. गलबले, शिक्षकवृंद एम.यु. खोब्रागडे, चंद्रवैभव आत्राम, नितीन सेडमाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी गावातील काही समाजबांधव व पालकांनाही छत्र्यांचे वाटप करण्यात आले. राहुल डांगे यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक आय.एम.शेरेकर यांनी तर आभार शिक्षक पी.टी.वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक बी.ए.क्षीरसागर, टी.एम. मल्लेलवार, के.आर. मसराम आदींनी सहकार्य केले.