गडचिरोली : येथील राणी दुर्गावती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनी संस्थेचे अध्यक्ष तथा आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच संस्थेचे संस्थापक तथा दलित मित्र लहुजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला.
विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मडावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दलित मित्र लहुजी मडावी यांच्या प्रतिमेला आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी अभिवादन केले. यावेळी प्राचार्या मडावी, शिक्षक कामडी यांनी दलितमित्र लहुजी मडावी यांच्या कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य बाबूसाहेब येरमे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सातपुते, सदस्य शेख, खोब्रागडे, आत्राम, रायपूरे, शेडमाके, सेवानिवृत्त शिक्षक मेश्राम, ठाकरे, दौरेवार, गेडाम आदी शिक्षकवृंद, पालक प्रामुख्याने उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे औचित्य साधुन दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मानसी रायपूर, समिक्षा पिपरे, रितू बोटरे तसेच बारावीची विद्यार्थिनी प्रज्ञा फुलझेले, चांदणी मडावी, छकुली मडावी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुकास्तरावर कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीनी चेतना वाईलकर, नंदिनी बारसागडे, श्रावणी कोवे, आस्था राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षिका, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन शिक्षक पिल्लारे व तर आभार धोडरे यांनी मानले.