आमगावच्या कारमेल अकॅडमीत केजीच्या विद्यार्थ्यांचे केले उत्साहात स्वागत

पालकांनी सहभागी होऊन वाढविला उत्साह

देसाईगंज : शहराला लागूनच असलेल्या आमगाव येथील कारमेल अकॅडमी मध्ये केजीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी कारमेल अकॅडमीचे मुख्याध्यापक फादर जिनेश मॅथू आणि उपमुख्याध्यापक मिस्टर लिटी तसेच शिक्षकप्रमुख दिशाली चावके आणि विभाग प्रमुख पुनम पुरी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्साहाने या शालेय सत्रारंभाच्या स्वागत सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी चिमुकल्या मुलांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋतुजा देवसकर, जयश्री रामटेके, शाफिया शेख, रिना मुंजनकर आणि स्वाती बन्सोड यांनी सहकार्य केले.