पुण्यातील राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोलीच्या कराटेपटूंनी मारली बाजी

सुवर्णांसह पटकाविली कास्यपदके

गडचिरोली : महाराष्ट्र कराटे असोसिएशनद्वारा पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या 45 व्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्हा अॅम्युचर क्रीडा कराटे डो असोसिएशनच्या कराटेपटूंनी घवघवीत यश मिळवत अनेक पदकं पटकावली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या देखरेखीखाली ही स्पर्धा झाली. यात सब ज्युनियर गटात – प्रिशा प्रल्हाद काबरा (सुवर्णपदक), सावी पेरसिंगवार (सुवर्ण व रजत पदक), ओम संदीप भांड (सुवर्णपदक व कांस्यपदक), आरोही रायपुरे (सुवर्ण व कांस्य), अद्वित गद्देवार (सुवर्ण व कास्य), दीपाश्री इंगुलकर (सुवर्ण), आर्या चहांदे (सुवर्ण), सिद्धी गेडाम (रजत), अंश रघुवानीश (कास्य), नारायणी दुम्पट्टीवार (कास्य), रुची पांडे (रजत), ऋतुजा गांधारे (रजत), अंजली कुकूडकर (कास्य), आदेश पातर (रजत) आदींनी पदकं पटकावली.

तसेच कॅडेट गटात- आरोही चव्हाण (दोन सुवर्णपदक) आणि सार्थक गेडाम (सुवर्णपदक व कांस्यपदक), ज्युनियर गटात- नंदिनी बारसागडे (सुवर्णपदक व कांस्यपदक), लावण्य कोवे (रजत पदक), अपूर्वा देशमुख (रजत पदक) घोगरे (कास्यपदक) त्याचप्रमाणे सीनियर गटात क्षितिज विगम (रजत व कांस्यपदक), मोहित मेश्राम (सुवर्ण व रजत पदक), प्रथम कोरेत (सुवर्ण व रजत पदक), कृष्णा चव्हाण (सुवर्णपदक) वसंतराव जनगाम (रजत पदक), खुशाल भांडेकर (रजत पदक).

या कराटेपटूंनी आपल्या यशाचे श्रेय जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे, सचिव योगेश, प्रशिक्षक मिलिंद गेडाम, शुभम कोंडे, दानिश शेख, सोनाली चव्हाण आणि आपल्या आई-वडीलांना दिले.