खरमतटोल्यातील माजी विद्यार्थ्यांनी घेतली विविध क्षेत्रात यशस्वी भरारी

कीर्तनाचे औचित्य साधून गावात सत्कार

कुरखेडा : चांगले शिक्षण आणि संस्कार या वातावरणात वाढलेल्या तालुक्यातील खरमतटोला गावातील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावाकडे आलेल्या आणि नव्याने विविध क्षेत्रात रुजू झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

गावात दिवाळीच्या पाडव्याननिमित्त 2 नोव्हेंबरला गावातील हनुमान मंदिराच्या परिसरात नत्थुजी दखणे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ.सतीश गोगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्रज्ञ (म्हैसूर) डॉ.प्रकाश हलामी होते. यावेळी प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित होते.

यावेळी सपना भीमराव शेंडे (पोलीस उपनिरीक्षक), प्रतीक भीमराव शेंडे (पोलीस अंमलदार), निखिल बाबा शेंडे (पोलीस अंमलदार), पियुष नानाजी डोकरमारे (पोलीस अंमलदार), अक्षय प्रकाश बोडके (तंत्र टेक्निकल), पोर्णिमा आत्माराम डोकरमारे (तलाठी), डॅा.नेहा सुधाकर आचला (MBBS डॅाक्टर), विकी ओमकार ठलाल (पोलीस अंमलदार), प्रीती पांडुरंग खुणे (पोलीस अंमलदार), आरती सुभाष उईके (तलाठी) यांच्यासह श्रावण फटिंग, तुकाराम डोकरमारे, मोतीराम कुमरे या ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ.रोशन नाटके, रेशीम नाटके, योगेश्वर नाटके, कृष्णा नाटके, नानाजी डोकरमारे, कुंदेश्वर नाटके, ग्रामपंचायत सदस्य राकेश खुणे, डोमाजी सुखदेवे, रवींद्रजी डोकरमारे, जीवन नाटके, पोलीस पाटील गीता लोहंबरे, माजी सरपंच शामराव कुमरे, माजी सरपंच तोमणशहा हलामी, माजी पं.स. सदस्य शारदा पोरेटी, उपसरपंच विश्रांती रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिक्षणाच्या माध्यमात खरमतटोला हा गावाने उच्च पातळी गाठली. या गावात हिरे तयार झालेले आहे. या गावाचा इतरांनी आदर्श घाव्या, असे मनोगत यावेळी डॅा.सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रोशन नाटके यांनी तर प्रास्ताविक योगेश्वर नाटके यांनी केले. आभार अनिल डोकरमारे यांनी मानले.