इंदिरा गांधी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

जीवनचरित्रावर टाकला प्रकाश

गडचिरोली : एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोलीव्दारा संचालित इंदिरा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्राचार्य नलिनी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा.हर्षाली मड़ावी, प्रा.काजल डोर्लीकर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंदांच्या फोटोला पुष्पमाला अर्पित करुन त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.काजल डोर्लीकर यांनी तर आभार प्रा.निमसरकार यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.