गडचिरोली : राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींपैकी कोणते शहर किती स्वच्छ आहे याचे सर्व्हेक्षण झाले. त्याचा अहवाल जाहीर झाला असून त्यात सर्वाधिक स्वच्छ पहिल्या 100 शहरांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तीन शहरांचा समावेश आहे. देसाईगंज नगर परिषदेने जिल्ह्यात पहिले तर राज्यात 33 वे स्थान पटकावले आहे. धानोरा नगर पंचायतने 72 ने स्थान, तर गडचिरोली नगर परिषद 98 व्या स्थानावर आहे.
शासनाने स्वच्छतेच्या बाबतीत घातलेल्या निकषांच्या आधारावर हे सर्व्हेक्षण झाले. मात्र जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींची कामगिरी स्वच्छतेच्या बाबतीत फारसी समाधानकारक नसल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.
आरमोरी नगर परिषदेचा क्रमांक राज्यात 211 वा आहे. त्यापेक्षा चामोर्शी (145) आणि अहेरी (181) नगर पंचायती वरच्या स्थानावर आहेत. याशिवाय कुरखेडा (313), भामरागड (333), सिरोंचा (350), मुलचेरा (362), एटापल्ली (380) आणि कोरची नगर पंचायत 382 व्या स्थानी आहे.
देसाईगंज आणि गडचिरोली नगर परिषदांची कामगिरी गेल्यावर्षीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांचे स्थान यादीत उंचावले आहे. मात्र आरमोरी नगर परिषद स्वच्छतेत मागे पडली आहे.