गडचिरोली : जिल्ह्यात 2025 या वर्षासाठी स्थानिक स्तरावर तीन सुट्या देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला आहे. त्यात पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशी असे तीन दिवस स्थानिक सुट्या राहणार आहेत.
पोळा (पहिला दिवस) : शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025 रोजी,
घटस्थापना : सोमवार, 22 सप्टेंबर 2025 रोजी
नरक चतुर्दशी (दिवाळी) : सोमवार, 20 ऑक्टोबर 2025 रोजी
या तीनही सुट्या गडचिरोली जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालये, तसेच बँकांना लागू होणार नाहीत.