गडचिरोली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तीनही दलाच्या सशस्र सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय स्त्रियांच्या “सिंदूर” ची इज्जत राखली आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना धडा शिकविला. त्यामुळे भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आज (दि.20) गडचिरोली आणि देसाईगंज शहरात “तिरंगा यात्रा” काढली जाणार आहे.
सर्व देशभक्त नागरिक, विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी सायंकाळी 4 वाजता देसाईगंज येथील हुतात्मा स्मारकाजवळ, तर गडचिरोलीत सायंकाळी 5 वाजता इंदिरा गांधी चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय एकता मंचतर्फे करण्यात आले आहे. भाजपच्या पुढाकाराने ही यात्रा काढली जात असली तरी ही यात्रा सर्वपक्षीय राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.