छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त कॅम्प भागात अभिवादन

भाजप नेत्यांसह नागरिकांची उपस्थिती

गडचिरोली : येथील कॅम्प एरियातील राम मंदिराच्या प्रांगणात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते प्रामुख्याने उपस्थित होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

याशिवाय या कार्यक्रमाला आ.डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ नेते रामायण खटी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, श्रीकांत पतरंगे, बंटी खडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्य व त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. महाराजांचा पराक्रम, निष्ठा आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान यांना उजाळा देणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

यावेळी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी धगधगते तेज होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

त्याग, शौर्य आणि अपरिमित कर्तृत्व यांच्या तेजाने त्यांनी हिंदवी स्वराज्याला बलशाली बनवले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)