गडचिरोली : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दुर्देवी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 28 जणांना गडचिरोलीच्या कारगील चौक स्मारक येथे 24 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता श्रध्दांजली वाहून या हत्याकांडाचा निषेध करण्यात येणार आहे.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समस्त नागरिकांनी सोबत मेणबत्ती आणून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.