गडचिरोली : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज 2 फेब्रुवारी कुणबी समाजसेवा समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती आणि स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कारमेल स्कूलच्या मागील शिवमंदिर परिसरातील नियोजित जागेवर हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी 8 वाजतापासून कुणबी समाजबांधवांचे एकत्रिकरण, सकाळी 9 वाजता ध्वजारोहण, महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दुपारी 2 वाजता आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, 3 वाजता समाजातील महिलांचे हळदीकुंकू व विविध कार्यक्रम, त्यानंतर भजनसंध्या, तर सायंकाळी 4 वाजता पालखी सोहळा होणार आहे. यात कुणबी समाजभवनातून शिवाजी महाविद्यालय, रेड्डी गोडावून चौक, चामोर्शी रोड, इंदिरा गांधी चौक येथून परत समाजभवनात पालखीचा समारोप होणार आहे.
सायंकाळी 6 वाजता प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. वक्ते म्हणून पोलीस उपनिरीक्षक नीतेश गोहणे, राजश्री गोहणे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता सत्र 2025 मधील इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचारी व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. गडचिरोली शहर व परिसरातील बहुसंख्य कुणबी समाजबांधवांनी सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुणबी समाजसेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
































