कारवाफाच्या आश्रमशाळेत गोवर आणि रूबेला लसीकरण

338 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

धानोरा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे 5 ते 15 वर्ष वयोगटातील 338 विद्यार्थ्यांचे गोवर व रूबेला लसीकरण पार पडले.

गोवर हा विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. त्यामुळे बालकांना गोवर व रूबेलाचा एकत्र डोज दिल्या जातो. या आजाराचे संपूर्ण निर्मूलन साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये गोवर व रुबेला आजार प्रतिबंधक लसीकरण कार्यशाळा घेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हे लसीकरण 15 ते 30 सप्टेंबर या पंधरवड्यात सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निशा रंधये, डॉ.संतोष पुंगाटी, डॉ.शुभम होरे, डॉ.जितेंद्र रंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश घोडमारे, रोशन तोरे, राजेश आखाडे, मिनाक्षी वखरे, रूपाली तुलावी, अविष्कार भांडेकर, सोनाली कस्तुरे, मंगेश वालदे, राजू डुकरे, अमित उंदीरवाडे, प्रदीप मडावी, अंतकला झाडे, नुतन भोस्कर, कविता अलाम, शोभा बावणे, सविता भंडारे, वैशाली गोंगले, विद्या कुकूडकर, सरिता किरंगे, अंतकला झाडे, मंगला वडनलवार, रमाकांत खोब्रागडे, रंजना किरंगे, सुंदरा तुमरेटी, अल्का परसे, निरंजना उसेंडी, प्रकाश मरापे, गणेश तोडासे यांनी लसीकरण पूर्ण केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला आजाराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

लसीकरणासाठी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, शिक्षक सुधीर शेंडे, एम.ई.ठाकूर, टी.ए.आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी.डी.नळे, व्ही.एस.देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, कविता बारसागडे, संजय धंदर, हितेश गावळकर, शिवानी शेट्टीवार, करिश्मा गोवर्धन, अभय कांबळे, अधीक्षिका पुष्पा चव्हाण व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.