गडचिरोली : झाडीपट्टीत अभिनयातच नव्हे, तर गायन, वादन, नृत्य, लावणी, गोंधळ, पांगुळ अश्या अनेक कला व लोककला जोपासणारे हिरे आहेत. गडचिरोली जिल्हयात ही हिऱ्याची खाण आहे. मुंबई-पुण्यातील कलावंतांपेक्षा गडचिरोलीतील कलाकार कोणत्याही बाबतीत मागे नाही. त्यामुळे प्रत्येक नवोदितांनी एकतरी कला अविरत जोपासावी, असे प्रतिपादन झाडीपट्टी रंगभूमीवर अर्धशतक गाजविणारे पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
गडचिरोलीत नाटयगृह नसल्यामुळे कलाकार तरोच प्रेक्षक दर्जेदार कार्यक्रमांपासून वंचित राहीले आहेत. गडचिरोली येथे नाट्यगृह बांधकामासाठी मागणी करा, मी आपल्यासोबत राहून योग्य तो पाठपुरावा करीन असेही डॅा.खुणे म्हणाले.
राजवी प्रॉडक्शन मित्र परिवार गडचिरोलीतर्फे आयोजित स्व.गजुभाऊ ऊर्फ विवेक काशिराम चडगुलवार स्मृती विदर्भस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटक म्हणून प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, से.नि. मुख्याध्यापक काशिराम चडगुलवार, वामनराव सावसाकडे, डॉ.उमेश समर्थ, मारोतराव इचोडकर, सुनील बडगुलवार, जेष्ठ नाट्य कलावंत मारकर मेश्राम, प्रविण मुक्तावरम आदी उपस्थित होते.
विदर्भातील कलावंतांकडून प्रतिसाद
या एकपात्री अभिनय स्पर्धेकरीता विदर्भातील २२ पुरुष व महिला कलावंतांनी हजेरी लावलेली आहे. हयांचे मधुनच नवोदित उत्कृष्ट कलावंत निर्माण होतील असा विश्वास मला आहे. त्यामुळे राजवी प्रॉडक्शन मित्र परीवार यांनी त्यांचे कार्य सतत सुरु ठेऊन कलावंताना रंगमंच उपलब्ध करुन त्यामधुन अनेक कलावंत घडविण्याचे मोलाचे कार्य करावे असे उदघाटक स्थानावरुन बोलतांना प्रा. नरेंद्र आरेकर म्हणाले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला राजवी प्रॉडक्शन तर्फे झाडीपटटीतील सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून पदमश्री डॉ.परशुराम खुणे यांचा तसेच प्रा.नरेंद्र आरेकर यांचा शाल, श्रीफळ, गौरवपर सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यांत आला. मारोतराव इचोडकर यांनी सुरेल आवाजात महाराष्ट्र गित व विजयी पौगडे यांनी नांदी सादर केली. सदर स्पर्धेत 11 महिला व 11 पुरुष कलावंतांनी सहभाग घेतला.
एकपात्री अभिनय स्पर्धेचे परिक्षक म्हणून झाडीपटटी रंगभूमीवरील कलावंत संतोष कुमार, मुकेश गेडाम व मनिषा मडावी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुनिल चडगुलवार, संचालन प्रविण मुक्तावरम व आभार डॉ. राकेश चडगुलवार यांनी मानले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय धात्रक सर, दिलीप मेश्राम, बाबाराव नक्षीणे, नामदेव इजनकर, अविनाश चडगुलवार, राकेश मारगोनवार, उदय धकाते, मनोज पवार, चुडाराम बल्हारपुरे, दादाजी चुधरी, जितेंद्र उपाध्याय, खुशरंग शेंडे, नामदेव इजनकर, रामकृष्ण ताजणे, रमेश नक्षीणे, मधुकर विधाते, विजय गिरसावळे, जगदीश मडावी, मनिषा मडावी, दीपक चडगुलवार, विनोद मारकवार, चैतन्य चडगुलवार यांनी सहकार्य केले.
असे आहेत विविध गटातील पुरस्कार विजेते
पुरुष गटातून प्रथम क्रमांक राज मराते गडचिरोली, व्दितीय राजेंद्र चिलगेलवार गडचिरोली, तृतीय महेंद्र गोंडाणे गोसीखुर्द, महिला गटातून प्रथम क्रमांक किमया के.खोब्रागडे रा.मूल, व्दितीय सुनिता आनंद तागवान, आरमोरी, तृतीय उषाताई मुळे, कनेरी, प्रोत्साहनपर पुरस्कार धनंजय ढवळे, लाखांदूर, विक्की वासुदेव मेश्राम, खरपुंडी, इशा मुनगेलवार चामोर्शी, साक्षी दिलीप उईके, देसाईगंज आणि लता निंदेकर रा.मुल यांनी पटकाविला.