सोडे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव व पालक मेळाव्यातून जागृती

नवागतांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा सोडे येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सजविलेल्या बैलबंडीमध्ये नवागत विद्यार्थ्यांना बसवून शैक्षणिक जनजागृती करत प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासह पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले.

या प्रवेशोत्सवाचे उद्घाटन सोडे येथील सरपंच पुनम किरंगे यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रंजना उसेंडी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर अपर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चंदा कांबळे, गृहपाल डी.डी.खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रविंद्र उईके, वंदना गावडे, नरेंद्र पोटावी, चंदू किरंगे, बंडू किरंगे, पोलीस पाटील संदीप परसा, सदूकर किरंगे, आशा किरंगे, विषय साधन व्यक्ती पी.डी.दुग्गा, पी.एन.मडावी, एस.एस.धाईत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थिनींद्वारे निर्मित चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, संगीत खुर्ची, नृत्य सादरीकरण आदींचे आयोजन केले होते. शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनींचा राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्काराअंतर्गत प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.आर. मंडलवार, संचालन ए.व्ही.भुजाडे तर आभार प्रदर्शन पी.यु. बखर यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक ए.एस.पोटे, वाय.एम. बिसेन, व्ही.एन. भैसारे, के.बी.बेझलवार, वाय.व्ही.भुरसे, के.एन. नागमोती, एन.एस.पानगंटीवार, ए.व्ही.गिल, एल.आर.महा, बी एम.येडुरे, अधीक्षक आर.डी.लांडगे आदींनी सहकार्य केले.