नागरिकांची स्थिती सुधारण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची

खासदारांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते झाले.

सावकारशाहीतून मुक्तता देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले आहे. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे, असे यावेळी खा.डॉ.किरसान यांनी केले. पतसंस्था योग्य पद्धतीने कशा चालतील यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था तथा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, दिलीप खेवले, प्रा.शेषराव येलेकर, सुमती मुनघाटे, सुलोचना वाघरे, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.