गडचिरोली : अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने शिवमंदिर संस्थान, साईनगर गडचिरोली येथे मंदिर स्वच्छता आणि महाजलाभिषेकासह महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.
यावेळी नागरिकांना सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्य लाभो, अशी सामूहिक मनोकामना करण्यात आली. धार्मिक आणि सामाजिक सहभागातून हा उपक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला.
या महापूजेला मा.खा.डॉ.नेते यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आ.डॉ.मिलिंद नरोटे, कि.मो.चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, भाजपचे शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, श्रद्धावान नागरिक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
































