एटापल्ली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेडच्या सुरजागड आयर्न ओर माईन्सच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सर्वांनी योगाभ्यास करत शरीर आणि मन सुदृढ ठेवण्याचा संकल्प केला.
हेडरी येथील माईन्स निवास येथे आयोजित या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि वाहन चालक अशा एकूण 250 लोकांनी सहभाग घेतला.
यावेळी योग शिक्षक दिलीप बुरांडे यांनी योगाचे महत्व सांगून शास्त्रीय पद्धतीने योगा कसा करायचा याचे धडे दिले. यावेळी लॉयड्स मेटल्सच्या वतीने सर्वाना टी शर्ट देण्यात आले होते. याशिवाय योगासने झाल्यानंतर उपस्थितांना फळं शीतपेय वाटण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता. त्यानुसार २१ जून २०१५ पासून ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येत आहे.