युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी उपसले उपोषणाचे हत्यार

गडचिरोलीचे युवा सांगलीत

गडचिरोली : सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपत आलेल्या युवा कार्य प्रशिणार्थींनी रिक्त सरकारी कार्यालयांमधील रिक्त पदांवर नियमित नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी आता संप सुरू केला आहे. सांगली येथे सुरू केलेल्या या राज्यस्तरीय उपोषणात गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यतील युवा प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्य शासन जोपर्यंत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे हे प्रशिक्षणार्थी ऊन आणि पावसाची तमा न बाळगता आपल्या जागेवर ठामपणे बसून आहेत. आधी कृष्णा नदीच्या घाटावर 1 आॅगस्टला उपोषण सुरू केले. त्यानंतर तिथे परवानगी दिली नाही नसल्याने 2 तारखेपासून स्टेशन चौक, सांगली येथे हे उपोषण चालू आहे.